ETV Bharat / sports

भारतीय संघाच्या माजी कर्णधाराला ईडीचं समन्स, करोडोंच्या घोटाळ्याचा आरोप; काय आहे संपूर्ण प्रकरण? - Former Cricketer summoned by ed - FORMER CRICKETER SUMMONED BY ED

ED Summons Former Cricketer : भारतीय संघाच्या माजी क्रिकेटरच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याला समन्स पाठवलं आहेत. असोसिएशनमध्ये 20 कोटी रुपयांच्या निधीची अफरातफर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ED Summons Former Cricketer
ED Summons Former Cricketer (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 3, 2024, 12:29 PM IST

हैदराबाद ED Summons Former Cricketer : भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स पाठवले आहेत. अझरुद्दीनवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे. अझरुद्दीनला आज ईडीसमोर हजर व्हावं लागणार आहे.

ईडीची 9 ठिकाणी छापेमारी : अझरुद्दीनची सप्टेंबर 2019 मध्ये हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) ची अध्यक्ष म्हणून निवड झाली. जून 2021 मध्ये त्यांना आपलं पद सोडावं लागलं होतं. निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ईडीनं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीनं तेलंगणातील 9 ठिकाणी छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रं आणि डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत.

ईडीनं नोंदवले एफआयआर : स्टेडियम बांधकामात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या म्हणण्यानुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामात आर्थिक अनियमितता केली होती. त्यांनी खासगी कंपन्यांना चढ्या दरानं कंत्राटं देऊन असोसिएशनचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान केलं. या प्रकरणी ईडीनं तीन एफआयआर नोंदवले असून पुढील तपास सुरु आहे.

राजकारणावर चांगली पकड : क्रिकेटपटूतून राजकारणी झालेले अझरुद्दीन 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथून खासदार झाले होते. 2014 ची लोकसभा निवडणूक त्यांनी राजस्थानमधून लढवली होती. मात्र निवडणूक हरली होती. 2018 मध्ये त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मजबूत फलंदाज आणि यशस्वी कर्णधार : मोहम्मद अझरुद्दीन हा भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आहे. भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याची गणना होते. मॅच फिक्सिंगमध्ये त्याचं नाव आल्यानंतर 2000 साली त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. त्यानं भारतासाठी 99 कसोटी आणि 334 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात 99 कसोटी सामन्यांमध्ये 45.03 च्या सरासरीनं 6215 धावा केल्या आहेत ज्यात 22 शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, त्यानं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 9378 धावा केल्या आहेत, ज्यात 7 शतकं आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. आजपासून सुरु होणार T20 विश्वचषकाचं 'महाकुंभ'; भारतात 'इथं' दिसेल लाईव्ह - Womens T20 World Cup LIVE IN INDIA

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.