ETV Bharat / state

पांडवांनी सातपुडा पर्वतात स्थापन केली देवी; आदिवासींची देवी अशी आहे ओळख - Navratri Festival 2024 - NAVRATRI FESTIVAL 2024

Navratri Festival 2024 : अश्विन नवरात्रोत्सवाला सातपुडा पर्वतरांगेत चिखलदरा येथील देवी पॉईंट या ठिकाणी श्री देवीच्या गुफेतदेखील नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली. अज्ञातवासात असताना पांडवांनी विराट नगरीत सातपुडा पर्वतरांगेत या देवीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. मेळघाटातील आदिवासींची देवी अशी या देवीची विशेष ओळख आहे. आता नवरात्रोत्सवात देवी पॉईंट परिसराला जत्रेचे स्वरूप आलंय.

Devi point temple
सातपुडा पर्वतात देवी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2024, 12:37 PM IST

Updated : Oct 3, 2024, 3:30 PM IST

अमरावती Navratri Festival 2024 - उंच पहाडांनी वेढलेल्या आणि खोल दरीला लागून असणाऱ्या चिखलदरा येथील एका गुफेत देवीचे मंदिर आहे. तलवार, त्रिशूळ अशी शस्त्र या देवीच्या हातात आहेत. या गुफेत एका कपारीमध्ये वाकून आतमध्ये गेल्यावर या देवीचं दर्शन होतं. विशेष म्हणजे या गुफेत बाराही महिने 24 तास पाण्याचे झरे आहेत.

मंदिरात येणारे भाविक लांब अशा गुफेच्या कपारीवरील दगडातून खाली गळणारं पाणी तीर्थ म्हणून पितात. हे तीर्थ आपल्या घरीदेखील नेतात. देवीच्या या गुफेमध्ये महादेवाची पिंडदेखील आहे. या गुफेवरून पाणी पडत असल्यामुळे या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांना अतिशय सावधपणे चालावं लागतं.

पांडवांनी सातपुडा पर्वतात स्थापन केली देवी (Source ; ETV Bharat Reporter)
अशी आहे आख्यायिका-
पांडव हे बारा वर्षे अज्ञातवासात असताना एका वर्षासाठी सातपुडा पर्वत रांगेत असणाऱ्या विराट राजाच्या राज्यात वास्तव्याला होते. सातपुडा पर्वतातील घनदाट जंगलात आपली आराध्य दैवता असावी, यासाठी पांडवांनी चिखलदरा येथील गुहेत देवीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. या देवी पॉइंट लगतच काही अंतरावर भीम कुंड आहे. भीमानं किचकाचा वध केल्यावर रक्तानं भरलेले हात या कुंडात धुतले, अशीदेखील आख्यायिका आहे. पांडवांनी स्थापन केलेल्या या देवीच्या दर्शनासाठी मेळघाटातील आदिवासी बांधवांसह संपूर्ण विदर्भा आणि लगतच्या मध्य प्रदेश राज्यातून अनेक भाविक येतात.

विदर्भातील चंद्रभागा नदीचं उगमस्थान- चिखलदरा येथील देवीच्या गुफेच्यावर असणाऱ्या टेकडीवर चंद्रभागा नदीचा उगम होतो. चिखलदरा आणि गाविलगड पठारावरून वाहत जाणारी ही नदी दर्यापूर शहरातून वाहत जाऊन समोर अकोला जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदीला मिळते. अचलपूर आणि परतवाड्यातून वाहणाऱ्या सपन आणि बच्चन या चंद्रभागा नदीच्याच उपनद्या आहेत.

आदिवासींचं आहे श्रद्धास्थान- चिखलदरा येथील देवी ही सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटातील कोरकू, गोंड या जमातीतील आदिवासी बांधवांचं चिखलदरा येथील देवीचे मंदिर हे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी बांधव नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने येतात. अश्विन नवरात्रपेक्षा आदिवासी बांधव चैत्र महिन्यातील नवरात्रला अधिक मानतात. अश्विन महिन्यात नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. तर चैत्र महिन्यात मात्र संपूर्ण महिनाभर चिखलदरा येथील देवी पॉइंट परिसरात मोठी जत्रा असते.

आदिवासी बांधव फेडतात नवस- अश्विन आणि चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवात मेळघाटातील आदिवासी बांधव देवीला बोललेला नवस फेडण्याची प्रथा या ठिकाणी आहे. पूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यातच कोंबडी आणि बकऱ्यांचा बळी दिला जायचा. आता मात्र मंदिर परिसरात ही बळी प्रथा बंद करण्यात आली. मंदिराच्या बाजूला आदिवासी बांधव कोंबडी किंवा बकऱ्याचा बळी देऊन सामूहिक भोजन करतात. काही आदिवासी बांधव मंदिराच्या परिसरात कोंबडी किंवा बकरी देवीच्या नावानं तशीच सोडून जातात. अशी माहिती देवी पॉईंट मंदिराचे सचिव हेमंत डोंगरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

असा असतो नवरात्रोत्सव- अमरावतीच्या श्री अंबादेवी मंदिर संस्थेद्वारे चिखलदरा येथील देवी पॉईंट मंदिर संचालित आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान सकाळी आणि सायंकाळी पूजा आरती केली जाते. यासह दिवसभर भजनाचा कार्यक्रम चालतो. अष्टमीला नवमीला नवरात्रोत्सवाचे उत्तपन आणि विजयादशमीला देवीची मिरवणूक निघते. नवरात्रोत्सवाची सांगता होते, अशी माहिती मंदिरातील पुजारी माधवराव सालफळे यांनी दिली.

  • 35 किलोमीटरवरून येते कावड यात्रा- गत पंधरा सोळांवर्षापासून परतवाडा येथील नवरंग दुर्गोत्सव मंडळाच्या वतीनं परतवाडा येथून चिखलदरापर्यंत 35 किलोमीटर चालत कावड यात्रा अश्विन नवरात्रोत्सवा दरम्यान या ठिकाणी येते. शेकडो युवक या कावड यात्रेत सहभागी असतात. संपूर्ण नवरात्र उत्सवा दरम्यान तीस ते पस्तीस हजार भाविक देवीच्या दर्शनाला येतात.

    देवीला आमंत्रणासाठी आदिवासी बांधवांची गर्दी- अश्विन नवरात्रोत्सवात चिखलदरा येथील देवीच्या मंदिरात आदिवासी बांधव हे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवीला आमंत्रण देण्यासाठी गर्दी करतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ज्योत पेटवून लिंबू ठेवलं जातं. आपल्यावर झालेल्या जादूटोणा यासह आपल्या कुटुंबाला किंवा घराला लागलेली नजर उतरावी, या उद्देशानं लिंबू वाहिलं जातं. देवीच्या गुफेवरून उगम पावणाऱ्या चंद्रभागा नदीच्या धबधब्यात आदिवासी बांधव आंघोळीला मान देतात. अनेकदा या ठिकाणी महिलांच्या अंगात देवी येण्याचा प्रकारदेखील पाहायला मिळतो.

हेही वाचा-

  1. तुळजा भवानी मंदिरात अमावस्येला पेटतात हजारो मशाली; आपल्या गावात मशाल नेण्याची प्राचीन प्रथा, जाणून घ्या काय आहे प्रकार - Navratri 2024
  2. नवरात्रीचे 9 दिवस उपवास करता? एनर्जेटिक राहण्यासाठी आहारात घ्या 'हे' पदार्थ - Navratri Festival 2024

अमरावती Navratri Festival 2024 - उंच पहाडांनी वेढलेल्या आणि खोल दरीला लागून असणाऱ्या चिखलदरा येथील एका गुफेत देवीचे मंदिर आहे. तलवार, त्रिशूळ अशी शस्त्र या देवीच्या हातात आहेत. या गुफेत एका कपारीमध्ये वाकून आतमध्ये गेल्यावर या देवीचं दर्शन होतं. विशेष म्हणजे या गुफेत बाराही महिने 24 तास पाण्याचे झरे आहेत.

मंदिरात येणारे भाविक लांब अशा गुफेच्या कपारीवरील दगडातून खाली गळणारं पाणी तीर्थ म्हणून पितात. हे तीर्थ आपल्या घरीदेखील नेतात. देवीच्या या गुफेमध्ये महादेवाची पिंडदेखील आहे. या गुफेवरून पाणी पडत असल्यामुळे या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांना अतिशय सावधपणे चालावं लागतं.

पांडवांनी सातपुडा पर्वतात स्थापन केली देवी (Source ; ETV Bharat Reporter)
अशी आहे आख्यायिका- पांडव हे बारा वर्षे अज्ञातवासात असताना एका वर्षासाठी सातपुडा पर्वत रांगेत असणाऱ्या विराट राजाच्या राज्यात वास्तव्याला होते. सातपुडा पर्वतातील घनदाट जंगलात आपली आराध्य दैवता असावी, यासाठी पांडवांनी चिखलदरा येथील गुहेत देवीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. या देवी पॉइंट लगतच काही अंतरावर भीम कुंड आहे. भीमानं किचकाचा वध केल्यावर रक्तानं भरलेले हात या कुंडात धुतले, अशीदेखील आख्यायिका आहे. पांडवांनी स्थापन केलेल्या या देवीच्या दर्शनासाठी मेळघाटातील आदिवासी बांधवांसह संपूर्ण विदर्भा आणि लगतच्या मध्य प्रदेश राज्यातून अनेक भाविक येतात.

विदर्भातील चंद्रभागा नदीचं उगमस्थान- चिखलदरा येथील देवीच्या गुफेच्यावर असणाऱ्या टेकडीवर चंद्रभागा नदीचा उगम होतो. चिखलदरा आणि गाविलगड पठारावरून वाहत जाणारी ही नदी दर्यापूर शहरातून वाहत जाऊन समोर अकोला जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदीला मिळते. अचलपूर आणि परतवाड्यातून वाहणाऱ्या सपन आणि बच्चन या चंद्रभागा नदीच्याच उपनद्या आहेत.

आदिवासींचं आहे श्रद्धास्थान- चिखलदरा येथील देवी ही सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटातील कोरकू, गोंड या जमातीतील आदिवासी बांधवांचं चिखलदरा येथील देवीचे मंदिर हे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी बांधव नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने येतात. अश्विन नवरात्रपेक्षा आदिवासी बांधव चैत्र महिन्यातील नवरात्रला अधिक मानतात. अश्विन महिन्यात नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. तर चैत्र महिन्यात मात्र संपूर्ण महिनाभर चिखलदरा येथील देवी पॉइंट परिसरात मोठी जत्रा असते.

आदिवासी बांधव फेडतात नवस- अश्विन आणि चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवात मेळघाटातील आदिवासी बांधव देवीला बोललेला नवस फेडण्याची प्रथा या ठिकाणी आहे. पूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यातच कोंबडी आणि बकऱ्यांचा बळी दिला जायचा. आता मात्र मंदिर परिसरात ही बळी प्रथा बंद करण्यात आली. मंदिराच्या बाजूला आदिवासी बांधव कोंबडी किंवा बकऱ्याचा बळी देऊन सामूहिक भोजन करतात. काही आदिवासी बांधव मंदिराच्या परिसरात कोंबडी किंवा बकरी देवीच्या नावानं तशीच सोडून जातात. अशी माहिती देवी पॉईंट मंदिराचे सचिव हेमंत डोंगरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

असा असतो नवरात्रोत्सव- अमरावतीच्या श्री अंबादेवी मंदिर संस्थेद्वारे चिखलदरा येथील देवी पॉईंट मंदिर संचालित आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान सकाळी आणि सायंकाळी पूजा आरती केली जाते. यासह दिवसभर भजनाचा कार्यक्रम चालतो. अष्टमीला नवमीला नवरात्रोत्सवाचे उत्तपन आणि विजयादशमीला देवीची मिरवणूक निघते. नवरात्रोत्सवाची सांगता होते, अशी माहिती मंदिरातील पुजारी माधवराव सालफळे यांनी दिली.

  • 35 किलोमीटरवरून येते कावड यात्रा- गत पंधरा सोळांवर्षापासून परतवाडा येथील नवरंग दुर्गोत्सव मंडळाच्या वतीनं परतवाडा येथून चिखलदरापर्यंत 35 किलोमीटर चालत कावड यात्रा अश्विन नवरात्रोत्सवा दरम्यान या ठिकाणी येते. शेकडो युवक या कावड यात्रेत सहभागी असतात. संपूर्ण नवरात्र उत्सवा दरम्यान तीस ते पस्तीस हजार भाविक देवीच्या दर्शनाला येतात.

    देवीला आमंत्रणासाठी आदिवासी बांधवांची गर्दी- अश्विन नवरात्रोत्सवात चिखलदरा येथील देवीच्या मंदिरात आदिवासी बांधव हे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवीला आमंत्रण देण्यासाठी गर्दी करतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ज्योत पेटवून लिंबू ठेवलं जातं. आपल्यावर झालेल्या जादूटोणा यासह आपल्या कुटुंबाला किंवा घराला लागलेली नजर उतरावी, या उद्देशानं लिंबू वाहिलं जातं. देवीच्या गुफेवरून उगम पावणाऱ्या चंद्रभागा नदीच्या धबधब्यात आदिवासी बांधव आंघोळीला मान देतात. अनेकदा या ठिकाणी महिलांच्या अंगात देवी येण्याचा प्रकारदेखील पाहायला मिळतो.

हेही वाचा-

  1. तुळजा भवानी मंदिरात अमावस्येला पेटतात हजारो मशाली; आपल्या गावात मशाल नेण्याची प्राचीन प्रथा, जाणून घ्या काय आहे प्रकार - Navratri 2024
  2. नवरात्रीचे 9 दिवस उपवास करता? एनर्जेटिक राहण्यासाठी आहारात घ्या 'हे' पदार्थ - Navratri Festival 2024
Last Updated : Oct 3, 2024, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.