ETV Bharat / sports

T20 महिला क्रिकेट विश्वचषक आजपासून सुरु; गुगलनं बनवलं अप्रतिम 'डूडल' - ICC Womens T20 World Cup - ICC WOMENS T20 WORLD CUP

Google Doodle Today : संयुक्त अरब अमिराती 2024 मध्ये महिला T20 विश्वचषकाच्या नवव्या हंगामाचं यजमानपद भूषवणार आहे, ज्यात जगातील विविध भागांतील दहा संघ सहभागी होणार आहेत. यासाठी गुगलनं खास डूडल तयार केलं आहे.

Google Doodle Today
Google Doodle Today (Google)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 3, 2024, 12:53 PM IST

दुबई Google Doodle Today : आजपासून ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेचा नववा हंगाम संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरु होत आहे. या निमित्तानं गुगलनं या स्पर्धेत खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंसाठी एक आकर्षक आणि रंगीत डूडल तयार केलं आहे.

गुगल डूडलमध्ये काय आहे खास? : ICC महिला T20 विश्वचषकाच्या निमित्तानं आज बनवलेल्या या रंगीत डूडलमध्ये महिला क्रिकेटपटूंना खेळपट्टीवर दाखवण्यात आलं आहे. एक क्रिकेटर फलंदाजी करताना आणि दुसरी झेल घेताना दिसत आहे. तर तिसरी विकेट पडल्याचा आनंद साजरा करताना दिसत आहे. या डूडलमध्ये क्रिकेट बॉल देखील आहे आणि Google मधील O बॉलचं प्रतिनिधित्व करतं. गुगल डूडल पेजवर दिलेल्या माहितीनुसार, 'आजच्या डूडलमध्ये 2024 ICC महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप साजरा केला जात आहे. 2009 मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेचा हा नववा हंगाम आहे. संयुक्त अरब अमिराती या मोठ्या स्तरीय स्पर्धेचं आयोजन करत आहे ज्यात 10 संघ सहभागी होणार आहेत.

महिलांना पुरुषांइतकच बक्षीस : उल्लेखनीय आहे की आयसीसीची ही पहिलीच स्पर्धा आहे, ज्यात महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या पुरुष खेळाडूंइतकीच बक्षीस रक्कम मिळेल. या स्पर्धेतील विजेत्यांना 2.34 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस दिलं जाईल. ग्रुप स्टेजसाठी क्रिकेट संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत ज्या गटात आहे, त्यात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.

भारताचे सामने कधी : भारताचा पहिला सामना शुक्रवारी (4 ऑक्टोबर) न्यूझीलंडशी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी (6 ऑक्टोबर) होणार आहे. तर बुधवारी (9 ऑक्टोबर) भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हे सामने दुबईत होणार आहेत तर 13 ऑक्टोबरला (रविवार) ऑस्ट्रेलियासोबतचा सामना शारजाहमध्ये होणार आहे.

हेही वाचा :

  1. आजपासून सुरु होणार T20 विश्वचषकाचं 'महाकुंभ'; भारतात 'इथं' दिसेल लाईव्ह - Womens T20 World Cup LIVE IN INDIA
  2. भारतीय संघाच्या माजी कर्णधाराला ईडीचं समन्स, करोडोंच्या घोटाळ्याचा आरोप; काय आहे संपूर्ण प्रकरण? - Former Cricketer summoned by ed

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.