Lata Mangeshkar sand sculpture: लता मंगेशकर यांचे पुरी बीचवर साकारले भव्य वाळूचे शिल्प - Made in Sand Art by Sudarshan

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 6, 2023, 12:13 PM IST

Updated : Feb 6, 2023, 4:07 PM IST

पुरी जगन्नाथ - लता दीदी हे नाव देशातील अबालवृद्धांसह सर्वांना  माहीत आहे. लता मंगेशकर यांचे गाणे ऐकले नसेल असा कदाचित कोणीही नसेल. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आवाजाच्या जादूने त्या आजही सर्वांच्या हृदयावर राज्य करत आहेत. गान कोकिळा गायिका लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त प्रख्यात शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी बीचवर सँड आर्टच्या माध्यमातून आवाजाच्या सम्राज्ञीला आदरांजली वाहिली आहे. मेरी अवाज ही मेरी पहचान हे शिल्प सुदर्शन यांनी सँड आर्टमध्ये बनवले आहे.

सुदर्शन पटनायक यांनी सांगितला शिल्प बनवण्याचा हेतू - लता मंगेशकर यांचे वाळूचे शिल्प साकार करणारे सुदर्शन पटनायक म्हणाले, लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. संपूर्ण देश त्यांना श्रद्धांजली वाहत असताना पद्मश्री सुदर्शन पटनायक यांनी लतादीदींना सँड आर्टमध्ये आदरांजली वाहिली. मेरी आवाजही मेरी पहचान है हा संदेश या शिल्पातून आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे. हे त्यांनी गीत गायले होते.'  

लहानपणापासून गायनात पारंगत - लता मंगेशकर वयाच्या ५ व्या वर्षापासून गायनात पारंगत होत्या. कृष्णधवल गाणी असो किंवा रंगीत गाणी त्यांनी आपल्या जादुई आवाजाने चित्रपटाचा पडदा भारुन सोडला होता. आपल्या 8 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 36 भाषांमध्ये 50,000 हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींसाठी गाणी गायली आहेत.  

लता दीदींवर झाला होता विषप्रयोग - 1963 मध्ये कोणीतरी लतादीदींना विष दिले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, "मी अंथरुणातून उठू शकत नव्हते. मी 3 महिने अंथरुणावर राहिले. मी 3 महिने उपचार सुरू ठेवले. माझ्या कुटुंबाला याबद्दल बोलणे आवडत नव्हते. कारण माझ्या आयुष्यातील तो सर्वात वेदनादायक क्षण होता. माझ्या हत्येचा कट कोणी रचला.पण पुराव्याअभावी सत्य बाहेर येऊ शकले नाही.  

मंत्रमुग्ध करणारी गाणी -  'मेरी आवाज ही मेरी पहचान है', 'पिया तोसे नैना लागे रे', 'लो चली मे अपने देवर की बारात लेके', 'मेरा दिल ये पुकारे आजा' अशी गाजलेली असंख्य गाणे लतादीदींनी आपल्या स्वरांनी सजवली आहेत. या सर्व गाण्यांना त्यांच्या फॅन्सी भरभरून प्रतिसाद दिला. आजही लतादीदींची गाणी प्रत्येक ठिकाणी वाजवली जातात. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक हा त्यांचा मोठा फॅन असलेला पाहायला मिळतो. हिंदी मराठी चित्रपटासहित देशातील इतर चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेले योगदान हे कधीही विसरता येणार नाही, त्यामुळे संपूर्ण देशाने प्रेम केलेल्या कलाकारांपैकी एक लता मंगेशकर या ओळखल्या जातात.

नेहरुंच्याही डोळ्यात आले होते पाणी -  1963 मध्ये लतादीदींनी नवी दिल्लीत 'ए मेरे वतन के लोगो' गायले. हे गाणे ऐकल्यानंतर ऐकणाऱ्यांसह तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे डोळे अश्रूंनी ओले झाले होते. रोमँटिक गाण्यांपासून सुरुवात करून लतादीदींनी भजन, गझल, कवाली, शास्त्रीय आणि राष्ट्रीय गाण्यांसारख्या सर्व प्रकारच्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. आजही लता दीदी आपल्या गाण्यांनी अनेकांच्या हृदयावर राज्य करतात.

हेही वाचा - Grammys Awards 2023: बेयॉन्सेने जिंकला सर्वोत्कृष्ट R&B गाण्याचा पुरस्कार जिंकला, सर्वाधिक विजयांचा रचला विक्रम

Last Updated : Feb 6, 2023, 4:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.