भाजप नेत्यांनी सध्या ताळतंत्र सोडलंय - जयंत पाटील - अतुल भातखळकर
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज नांदेड दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना अतुल भातखळकर यांच्यावरसुद्धा पाटील यांनी टीका केली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवार यांचीसुद्धा चौकशी करा अशी मागणी भाजपचे अतुल भातखळकर यांनी केली होती. त्यावर पाटील याना विचारले असता. भाजप नेत्यांनी सध्या ताळतंत्र सोडलंय, त्यांना सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसच दिसतेय अशी टीका जयंत पाटील यांनी केली. पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांची ईडी चौकशी करण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केल्यानंतर पाटील नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST