Kangana Ranaut wedding plans : मला लग्न करायचं आहे पण...: कंगना राणौतने केले लग्नाबाबत भाष्य - I do want to get married but
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. तिने तिच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल सांगितले आहे. बुधवारी न्यूजवायरशी खास संवाद साधताना कंगना म्हणाली की, 'प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि जर ती वेळ माझ्या आयुष्यात यायची असेल तर ती येईलच. मला लग्न करून स्वतःचे कुटुंब करायचे आहे... पण, योग्या वेळी ते होईल.' साई कबीर श्रीवास्तव दिग्दर्शित टिकू वेड्स शेरू या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत आणि 23 जूनपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर हा सिनेमा स्ट्रीम करण्यासाठी सज्ज आहे. अलीकडेच, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत ट्रेलरचे लॉन्चिंग केले, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. याशिवाय ती इमर्जन्सी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून आणिबाणीच्या विषयावरील या चित्रपटात ती माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.