Actor Ram Charan : साउथ स्टार राम चरण घेतलं बाप्पाचं दर्शन ; सिद्धिविनायक मंदिरातील व्हिडिओ झाला व्हायरल... - राम चरण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 4, 2023, 1:10 PM IST
मुंबई : Actor Ram Charan : साउथ स्टार राम चरण हा सध्या चर्चेत आला आहे. राम चरणचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गेला आहे. रामचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. रामनं या फोटोमध्ये काळा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. याशिवाय त्यानं खांद्यावर टॉवेल आणि कपाळावर टीका लावला आहे. तसेच यावेळी राम चरणनं पापाराझींना हात जोडून पोझ देखील दिली आहे. राम चरण मंगळवारी विमानतळावरही दिसला होता. तेव्हाही त्यानं चप्पल घातली नव्हती. राम चरणच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून अनेक कमेंट्स येत आहेत. राम चरण अनवाणी का?, असा सवाल सर्वजण करत आहेत. खरं पाहता राम अनवाणी राहण्यामागं एक खास कारण आहे. या लूकमागे अयप्पा दीक्षा कारणीभूत आहे. सध्या तो 41 दिवसांचे कडक उपोषण करणार आहे. तो 41 दिवस तामसिक जीवनशैलीपासून दूर राहतो आणि सात्विक जीवन जगतो. याशिवाय तो सबरीमाला मंदिराला देखील भेट देतो. राम हा अनेक वर्षांपासून सबरीमाला मंदिरात जात आहे. आजकाल तो अनवाणी राहण्याची प्रथा पाळत आहे. रामच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच कियारा अडवाणीसोबत 'गेम चेंजर' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.