VIDEO : मीच निधी दिला नाही तर तो काय .... करणार - अजित पवार - अजित पवार दत्तात्रय भरणे टोला बातमी
🎬 Watch Now: Feature Video
बारामती - निंबुत (ता. बारामती) येथे रविवारी एका उद्घाटन कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार ( DyCM Ajit Pawar ) बोलत होते. ते म्हणाले, संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा निरा-बारामती रस्ता महत्त्वाचा आहे. बांधकाम खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( Minister Dattatraya Bharne ) येथे उपस्थित आहेत. दत्तामामा तुम्ही नुसता इंदापूर तालुक्याकडे लक्ष देऊ नका. मलादेखील या बाबाला विनंती करावी लागते, आमच्या तालुक्यातील रस्त्यांनाही निधी द्या. अजित पवार पुढे म्हणाले, बांधकाम खात्याच्या चाव्या जरी दत्तामामाच्या हातात असल्या तरी वित्तमंत्री म्हणून त्यांच्या निधीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मीच निधी दिला नाही तर तो काय घंटा करणार' असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या अनपेक्षित वक्तव्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे चांगलेच गोंधळले. तर सभागृहात देखील हास्यकल्लोळ उडाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST