Hijab Row Verdict : न्यायालयाच्या निकालाने निराश, याचिकाकर्त्यांना मदत करण्यास तयार - आमदार झिशान सिद्दिकी - हिजाब प्रकरण झिशान सिद्दिकी प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14746016-thumbnail-3x2-op.jpg)
मुंबई - हिजाब प्रकरणावर काल कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. न्यायालयाने हिजाब वादातील याचिका फेटाळली आहे. त्यामुळे, कर्नाटकातील शाळेतील हिजाब बंदीवर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झाला आहे. हिजाब हा मुस्लीम धर्माचा अनिवार्य भाग नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे, शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा निर्णय आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाने मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे. एकंदरीत या विषयावर काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी ( Hijab Verdict Zeeshan Siddique reaction ) यांच्याशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने बातचित केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST