VIDEO : पुण्याच्या राजीव गांधी उद्यानांमध्ये आता भेटणार लता उषा आशा - cubs in rajiv gandhi zoo
🎬 Watch Now: Feature Video
पुणे- पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये जुन्नरवरून ज्या बिबट्या मादी आणलेल्या आहेत. त्याचे देखभाल करणाऱ्या सेवकांनी त्यांचं नाव लता उषा असे ठेवले आहे. नाही यामागे मंगेशकर कुटुंबाचा समावेश नसून तेथील सेवकांनी या बिबट्यांना मादिना हे नाव दिले आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्यांचे हल्ले हे जुन्नर तालुक्यात वाढले होते. त्यामध्ये मादी बिबट्या यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात होते. काही मादी बिबट्या या नरभक्षक देखील होत्या. लहान मुलांना पळवून घेऊन जाणे, शेतात लपून राहणे या गोष्टी करत होत्या. यातील काही मादींना पकडून त्यांची रवानगी थेट पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात करण्यात आली. बिबट्या मादी दिसत असल्या तरी तेवढ्यात या क्रूर आणि हिंस्र देखील आहे. त्यांच्याजवळ जाणेही अशक्य आहे. वनरक्षक यांनी आपल्या आवडीच्या गायिकांची म्हणजेच लता उषा यांची नावे मादींना ठेवली आहेत. कारण या सेवकांना या गायिकांची गाणी फार आवडतात. या बिबट्यांचे वय अवघे साडेतीन वर्ष आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST