Sharad Pawar PM Modi meet: केंद्रीय तपास यंत्रणांची तक्रार करण्यासाठीच शरद पवार पंतप्रधानांना भेटले - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले - शरद पवार पंतप्रधान मोदी भेट नाना पटोले प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ( Nana Patole comment on Sharad Pawar PM Modi meet ) यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होतील, अशी चर्चा सुरू झाल्याने शिवसेना आणि काँग्रेसच्या गोत्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही केंद्रीय तपास यंत्रणांची तक्रार करण्यासाठी घेतली आहे. त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही फरक पडणार नाही. पंतप्रधान हे कुठल्याही पक्षाचे नसतात, असा आमचा समज आहे. त्यामुळेच, केंद्रीय तपास यंत्रणांचे गाऱ्हाणे मांडण्याकरिता शरद पवार पंतप्रधानांना भेटले. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संदर्भातील ईडीने केलेल्या कारवाईची माहिती दिल्याचे सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST