छत्री तलाव परिसरात युवक-युवतींनी साजारा केला फ्रेंडशिप डे; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Social Distance disobey chatri Lake
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - कोरोनाचे सावट असताना ही आज शकडो युवक-युवतींनी छत्री तलाव परिसरात धुमधडाक्यात फ्रेंडशिप डे साजरा केला. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी भारतात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदाचा फ्रेंडशिप डे हा रविवारी आल्यामुळे शहरातील अनेक तरुण-तरुणी छत्री तलाव परिसरात एकत्र आले व त्यांनी फ्रेंडशिप डे साजरा केला. मात्र यावेळी कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचे चित्र छत्री तलाव परिसरात पहावयास मिळाले. अनेक युवतींनी तोंडाला मास्क बांधले नव्हते, तर सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला होता.