thumbnail

By

Published : Sep 30, 2021, 5:22 PM IST

Updated : Sep 30, 2021, 5:32 PM IST

ETV Bharat / Videos

पिंडदानाला 'असा' ही शिवतो कावळा; पाहा व्हिडिओ

पितृपक्षास हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवड्यात नागरिक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध अर्पण विधि करतात. ज्यात कुत्रा, गाय आणि कावळा यांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोहोचतात. आत्म्याची तृप्ती होते. त्यांना शांती मिळते, असा समज आहे. पितरांच्या मृत्यूतिथीनुसार श्राद्धकर्म करण्यात येते. आज अविधवा नवमी (नवमी श्राद्ध) आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका नागरिकाने कावळ्याला पकडले आहे. तो नागरिकाच्या पिंडदानाचे नेवैद्य हे कावळ्याला खाऊ घालत आहे. व्हिडिओमध्ये नागरिक नेवैद्य खाऊ घालण्यासाठी त्याला दहा रुपये देखील देण्याचे बोलत आहेत. अद्याप हा व्हिडिओ कोठून व्हायरल झाला याबद्दल माहिती मिळू शकली नाही आहे.
Last Updated : Sep 30, 2021, 5:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.