चंद्रपूरच्या धर्तीवर एखादी समिती नेमून गडचिरोलीचीही दारूबंदी उठवण्याचे वडेट्टीवार यांचे संकेत
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली - चंद्रपूरची दारूबंदी सफलतेने उठवल्यानंतर आता गडचिरोलीचीही दारुबंदी उठवण्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. चंद्रपूरची दारूबंदी उठल्यामुळे लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, तिथे पालकमंत्री वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून पुढील कार्यवाही केली जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले. दारूबंदीला विरोध करणारे जिल्ह्यातील समाजसेवी बेगडी आहेत. या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये त्यांचे काहीही योगदान नाही, जनता त्यांच्या पाठीशी नाही. तेच लोक आपली भूमिका मांडत असतात, अशी तिखट टीकाही त्यांनी केली. चंद्रपूरप्रमाणेच गडचिरोलीतही दारूबंदीचा आढावा घेणारी एखादी समिती पालकमंत्र्यांनी स्थापन केली, तर त्यात कौल समोर येऊ शकतो. त्यादृष्टीने त्यांच्याशी चर्चा करू, असे सांगत वडेट्टीवार यांनी गडचिरोलीच्या दारूबंदीला उठवण्याची एकप्रकारे तयारीच केल्याचे दिसून येते.