Video: सततचे पाणी भरणे, वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर संतप्त - मुंबई पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12476297-thumbnail-3x2-angry-mumbaikar.jpg)
मुंबई - शहरात गुरुवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे मुंबईत सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्त्यावर आणि रुळावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर शिवाजी मोरे या मुंबईकरांना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे होती. सरकारने मुंबईच्या पाणी आणि वाहतूक कोंडीवर लक्ष द्यावे. आणि मुंबईकरांना होणाऱ्या या नाहक त्रासातून बाहेर काढावे. ज्याप्रमाणे मतदानाच्या वेळी आमच्या दाराला येतात, त्याप्रमाणे आमच्या समस्याकडेही लक्ष द्यावे अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.