वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात साचले पावसाचे पाणी - Washim Latest
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - जिल्ह्यात रविवारी जोरदार पाऊस झाला. यादरम्यान वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 30-32 मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांची धांदल उडाली. गोरगरिब कुटूंबातील सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उभारण्यात आलेले वाशिममधील २०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय नेहमीच चर्चेत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे वाशीम जिल्ह्याच्या अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये बेडही उपलब्ध होत नाही. हे पाहता इतर आजारांच्या अनेक रुग्णांनी आपला उपचार करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले आहे. मात्र अवकाळी पावसामुळे या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे.