केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात - Jan Ashirwad Yatra begins
🎬 Watch Now: Feature Video
पालघर - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पालघरमधून सुरुवात झाली आहे. पारंपरिक आदिवासी नृत्य करत भारती पवार यांचे भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले. पालघर मधील हुतात्मा स्तंभ येथे हुतात्म्यांना वंदन करून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सोबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून पालघर जिल्ह्यात विविध भागात यात्रा जाणार आहे.