रेमडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक; पुण्यातील प्रकार - Black market of Pune Remedicivir Injection
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - दौंड आणि जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड करण्यात आली आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. नारायणगाव येथे रेमडेसिवीर काळाबाजार करणारा एक जण ताब्यात घेतला आहे. तो एक रेमडेसिवीर इंजेक्शन चक्क ४५ हजारांना विकत होता. रोहन शेखर गणेशकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ रेमडेसिवीर इंजेक्शन सह 21 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दौंड शहरातील हुतात्मा चौक गणपती मंदिर परिसरात अक्षय सोनवणे व सुरज साबळे असे दोघे जण रेमडेसिवीरचा काळाबाजार करत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेला समजले होते. स्थानिक गुन्हे शाखेला याची माहीती मिळताच, त्यांनी सापळा रचून या दोघांना रेमडेसिवीर जास्त भावात विकताना रंगेहाथ पकडले व अटक केले. त्यांच्याकडून एकूण ३ रेमडेसिवीर इंजेक्शनसह, ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.