VIDEO : शरद पवार यांनी अमरावतीत येऊ नये - अनिल बोंडे - अमरावती हिंसाचार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 17, 2021, 1:10 PM IST

अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (बुधवार) पासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. यावर भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांनी अमरावतीत व विदर्भाच्या दौऱ्यावर येऊ नये अशी प्रतिक्रिया दिली. शरद पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौरा करीत आहे हे माहिती नाही. त्यांनी अमरावती मध्ये येऊच नये. त्यांना संतप्त शेतकरी व नागरिक त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. विदर्भात फिरतांना सुद्धा त्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी असंही बोंडे म्हणाले. कारण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही व अमरावती घडलेल्या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.