वाशिममध्ये रस्ते कामात कोणताच अडथळा नाही, स्वतः गडकरींना पत्र लिहून कळविणार - शंभूराज देसाई - Union Minister Nitin Gadkari
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठविलेल्या लेटरबॉम्बवरही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केले. यासंदर्भात काल जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, तसेच रस्तेविकास महामंडळाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. मात्र, यामध्ये कोणीही रस्ते कामात अडथळा केला नाही किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अडथळा निर्माण केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे मला मिळालेल्या माहितीनुसार तसे काही झाले नसल्याचे समजले. मी आता या विषयी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून कळविणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. शिवाय, यापुढे विकास कामात कोणीही अडथळा निर्माण केला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत, असे देसाई यांनी सांगितले आहे.