पर्यटकांना भुरळ पडतोय सहस्त्रकुंड धबधबा - सहस्त्रकुंड धबधब्या बद्दल बातमी
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला पैनगंगेवरील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
सहस्रकुंड धबधबा पर्यटकांनी भरला -
सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो. तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात येतो. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांचे डोळयाचे पारणे फेडणारा आहे. 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहे. जून महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने या पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा वाहू लागला. त्यामुळे याकडे पर्यटक पाहण्यासाठी येत आहे. सलग तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे पैनगंगेवर धोधो कोसळणाऱ्या या धबधब्यास भेट देऊन परिसरातील पावसाळी पर्यटनाला समृद्ध करणारा हा सहस्रकुंड धबधबा पर्यटकांनी भरला आहे.