नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीत पोलीस बंदोबस्त तैनात - Nagpur police latest news
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - नववर्षाच्या स्वागताला आता काहीच तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी कुठली अप्रिय घटना घडू नये, याकरिता तब्बल चार हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त शहरात तैनात केला आहे. याशिवाय, वाहतूक विभागाचे सातशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी देखील रात्रभर बंदोबस्तात तैनात असतील, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी शहरातील उड्डाणपूल देखील वाहतुकीकरिता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रकालीन संचारबंदी सुरू असल्याने यावर्षी फारसा गोंधळ होण्याची शक्यता नसली तरी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. शहरात सुरक्षा व्यवस्था कशी असेल, याचा आढावा आमच्या प्रतिनिधी घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी..