VIDEO : धोकादायक इमारतीमुळे पोलीस कुटुंबीयांचा जीव टांगणीला - video news only
🎬 Watch Now: Feature Video
पावसाळा आला की मुंबईमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरवणीवर येतो. अशीच एक धोकादायक इमारत वरळीच्या पोलीस कॅम्प परिसरात आहे. पोलीस कॅम्पमधील या 36 नंबरच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ही इमारत एवढी दयनीय झाली आहे, की इमारतीच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठीही 10 वेळा विचार करावा लागतो. इमारतीला मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. इमारतीविषयी वारंवार तक्रारी करुन देखील प्रशासन दुर्लक्ष्य करत आहे, अशा प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिल्या आहेत.