मुलाचा हट्ट पुरविण्यासाठी खासदार नवनीत राणा बैलबाजारात - बैलपोळा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - बैल पोळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा सण. वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बैल शेतात राबतात. राज्याचा मान म्हणून शेतकरी बैल पोळा साजरा करतात. तान्हापोळा लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे. लहाने मुले या दिवशी लाकडी, मातीच्या बैलांना सजवून घरोघरी जातात. त्यांना काही सणाची पोळी म्हणून पैसे देण्याची प्रथा आहे. यातच रविवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या अमरावती शहरातील बाजारात दिसून आल्या. त्यांनी आपल्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी मुलाला मातीचे बैल खरेदी केले.