VIDEO : मुख्यमंत्र्यांनी आपला चार्ज दुसऱ्यांना द्यावा, महाआघाडी सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही -फडणवीस - devendra fadnavis on maharashtra government
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13981781-thumbnail-3x2-fad.jpg)
विधानसभा अध्यक्षांची निवड विधानसभा स्थापनेपासून असणारा नियम बदूलून घेण्याची महाविकास आघाडीवर नामुष्की आली आहे. गुप्त मतदान झाले तर सरकारमधील आमदार आपला असंतोष दाखवतील याची सरकाला भीती आहे. राज्य सरकार घाबरलेलं आहे. सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. या भीतीमुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बदल करण्यात आले आहेत अशी टीका यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका करताना ओबीसी आरक्षण, अतिवृष्टीतील मदत, मुख्यमंत्र्यांची तब्बेत, भास्कर जाधव यांचे वक्तव्य अशा विविध विषयांवर भाष्य केले. विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासठी होणाऱ्या निडणुकीत राज्य सरकारने केलेल्या बदलावरून फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्र्यांची तब्बेत ठिक नसेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही, भाजपचा त्यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही. परंतु, ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नसतील तर एखाद्या मंत्र्याकडे त्यांनी आपला चार्ज द्यावा" अशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Last Updated : Dec 22, 2021, 9:12 PM IST