thumbnail

By

Published : Jun 1, 2021, 3:50 PM IST

Updated : Jun 1, 2021, 5:36 PM IST

ETV Bharat / Videos

महाराजबाग परिसरात बिबट्याने केली डुकराची शिकार!, वनविभाग अलर्ट मोडवर

नागपूर - गेल्या चार दिवसांपासून नागपूरच्या विविध भागांमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. आज सकाळी महाराज बागेच्या शेजारी असलेल्या कृषी विभागाच्या प्रादेशिक कृषी विस्तार कार्यालयाच्या परिसरात बिबट्याने डुकराची शिकार केल्याचे आढळून आले. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. महाराजबाग शेजारी असलेल्या नाल्यातुन हा बिबट्या गायत्री नगर ते महाराजबागपर्यंत आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्याने डुकराची शिकार केल्याची माहिती समजतात वन विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर स्थानिक सीताबर्डी पोलीस कर्मचारी अधिकारी कृषी विभागाच्या प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यालयात दाखल झाले होते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. यामध्ये कुठेही बिबट्याचे पग मार्ग आढळून आले नाहीत. मात्र ज्याप्रकारे डुकराची शिकार करण्यात आलेली आहे ते बघता ही शिकार त्यानेच केली असावी असा दाट संशय निर्माण झालेला आहे.
Last Updated : Jun 1, 2021, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.