ETV Bharat / state

मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट, लक्ष्मण हाके यांचा आरोप; म्हणाले "मद्यपान केल्याचा पुरावा दाखवा" - Laxman Hake Allegations - LAXMAN HAKE ALLEGATIONS

Laxman Hake Allegations : मराठा आंदोलकांनी ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांना घेरुन मोठा राडा केला. लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करुन शिवीगाळ केली, असा आरोप मराठा आंदोलकांनी केला. यावेळी लक्ष्मण हाके यांनी "हा मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता," असा आरोप केला आहे.

Laxman Hake Allegations
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2024, 10:21 AM IST

पुणे Laxman Hake Allegations : मराठा आंदोलकांनी सोमवारी पुण्यात लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करुन शिवीगाळ केल्याचा आरोप केला. त्यामुळे पुणे परिसरात मोठा गोंधळ उडाला. रात्री मराठा आंदोलकांनी गादरोळ करत लक्ष्मण हाकेंना पोलीस ठाण्यात नेल्याचा दावा केला. मात्र यानंतर प्रतिक्रिया देताना ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी, "दोन तरुणांनी पाळत ठेवली. त्यानंतर 20 ते 30 तरुणांनी मला कोंढवा परिसरात गाठून माझी मानगूट पकडली. हा मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता. मला मद्यप्राशन केलं म्हणून कबुलीसाठी दबाव टाकत व्हिडिओ बनवला, असा आरोप केला. मी कोणत्या हॉटेलमध्ये गेलो, मी कुठं मद्यपान केलं, त्याचे व्हिडिओ फुटेज दाखवावे, आपण कोणत्याही तपासणीला तयार आहोत," असं स्पष्ट केलं.

लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप : कोंढवा परिसरात मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना सोमवारी सायंकाळी पकडून मद्यप्राशन केल्याचा आरोप केला. यावेळी मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना पकडून पोलीस ठाण्यात नेलं. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांनी अगोदर केलेल्या वक्तव्याची आठवण करुन देत त्यांना अनेक प्रश्न विचारले. यावेळी मोठा जमाव जमल्यानं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट, लक्ष्मण हाके यांचा आरोप (Reporter)

मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट : मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केला. यावेळी झालेल्या राड्यानंतर बोलताना लक्ष्मण हाके यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे. "मी दुचाकीवर असताना काही तरुणांनी मला मानगुटीला पकडून माझा व्हिडिओ काढला. दोन तरुण 5 वाजतापासून माझ्या पाळतीवर होते. त्यातला एक तरुण मला बोलूनही गेला. मी मद्यप्राशन केल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र मी कोणत्या हॉटेलमध्ये गेलो, मी कुठं मद्यपान केलं, त्याचे व्हिडिओ, फोटो दाखवावे. मी कोणत्याही तपासणीसाठी तयार आहे. मला जीवे मारण्याचा हा पूर्वनियोजित कट होता," असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

पोलीस करणार वैद्यकीय तपासणी : मराठा आंदोलकांनी मोठा राडा केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी ओबीसी आणि मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं. यावेळी पोलीस उपायुक्त आर राजा यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. यावेळी पोलीस उपायुक्त आर राजा यांनी, "आम्ही दोन्ही समाजाचं म्हणणं ऐकूण घेतलं आहे. योग्य तपा करुन कायदेशीर कारवाई केली जाईल. दोघांचीही तक्रार घेऊन तपास केला जाणार आहे. दोघांचीही तक्रार घेऊन तपास केला जाणार आहे." लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय तपासणी करणार का, असा सवाल त्यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारला. यावेळी हा पुढील तपासाचा भाग असून या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असंही पोलीस उपायुक्त आर राजा यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मद्य प्राशन करुन शिवीगाळ; मराठा आंदोलकांचा आरोप - OBC leader Laxman Hake
  2. "...तोपर्यंत जातनिहाय जनगणना होणे अशक्य आहे", लक्ष्मण हाके यांची स्पष्टोक्ती - Laxman Hake On Caste Census
  3. ओबीसीचे नेते संरक्षण आणि आरक्षणासाठी एकत्र आले; लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका - Laxman Hake On Jarange Patil

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.