ETV Bharat / business

ऐन सणासुदीत 19 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ, जाणून घ्या, महानगरांमधील दर - Gas cylinder rate news - GAS CYLINDER RATE NEWS

LPG commercial cylinder price hike दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरचे दर बदलतात. आज व्यावसायिक कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचे वाढले आहेत.

Gas cylinder rate news
गॅस सिलिंडरचे दर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2024, 8:56 AM IST

Updated : Oct 1, 2024, 1:04 PM IST

हैदराबाद- LPG commercial cylinder price hike- ऐन सणासुदीला आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी जनतेला महागाईचा चटका बसणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढविले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढविले आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटच्या माहितीनुसार, व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आजपासून वाढले आहेत. या सिलिंडरची किंमत आजपासून 1,740 रुपये आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत पूर्वीप्रमाणेच 803 रुपये असणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 1692.50 रुपये, कोलकातामधील सिलिंडरचे दर 48 रुपयांनी वाढून 1850.50 रुपये आहेत. तर चेन्नईमध्ये हाच सिलिंडर 1903 रुपयांत खरेदी करावा लागतोय.

सप्टेंबरमध्ये गॅस सिलिंडरचे दर 39 रुपयांनी वाढले होते. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा दर 818.50 रुपये आहे. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडर हा 803 रुपयांना मिळत आहे. कोलकातामध्ये 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 829 रुपये आहे. तर मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर हा 802.50 रुपयांना विकला जात आहे.

जाणून घ्या विविध शहरांमधील गॅस सिलिंडरचे दर- दिल्लीजवळ असलेल्या गुरुग्राममध्येदेखील व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. गुरुग्राममध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर हा 1756 रुपये आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरचा दर 811.50 रुपये आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 1995.50 रुपये आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरचा दर 892.50 रुपये आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौला व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1861 रुपये आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 840.50 रुपये आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 19 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत 1776.50 रुपये आहे, तर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 806.50 रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, कर धोरण, मागणी-पुरवठा यातील तफावतीवरून गॅस सिलिंडरचे दर बदलण्यात येतात. मात्र, सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कशामुळे बदलण्यात आले आहेत, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा-

  1. रोजच्या महागाईच्या भडक्यात आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा 'तडका' - LPG Price rise
  2. गॅस सिलिंडरपासून ते मोबाईल रिचार्जपर्यंत...आजपासून बदलले 'हे' नियम; तुमच्या खिशावर होणार मोठा परिणाम - Rule Change From 1st July 2024

Last Updated : Oct 1, 2024, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.