श्रीनगर Jammu Kashmir Election 2024 Live Update : जम्मू काश्मीरमध्ये आज विधानसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. थोड्याच वेळापूर्वी मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात 7 जिल्ह्यातील 40 मतदार संघात आज मतदान पार पडणार आहे. या 40 जागांसाठी तब्बल 1415 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी मतदानाला शांततेत सुरुवात झाली. मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. सकाळीच ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांनीही मतदान करुन मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
28.12% voter turnout recorded till 11 am in the third and final phase of the Jammu and Kashmir Assembly elections.
— ANI (@ANI) October 1, 2024
Bandipore-28.04%
Baramulla-23.20%
Jammu-27.15%
Kathua-31.78%
Kupwara-27.34%
Samba-31.50%
Udhampur-33.84% pic.twitter.com/CeGGywTeir
#WATCH | Jammu: Democratic Progressive Azad Party Chairman Ghulam Nabi Azad says, " i appeal to people to come out and vote. the political party that comes to power should resolve the issues. i will not speak against or in favour of any party. voters will decide whether (majority)… pic.twitter.com/seo7Hu1wl4
— ANI (@ANI) October 1, 2024
Amit Shah calls for strong leadership in J-K as Assembly Polls reach final phase
— ANI Digital (@ani_digital) October 1, 2024
Read @ANI Story | https://t.co/GcvumpWHis#AmitShah #JammuKashmir #Assemblyelection pic.twitter.com/UY4jjC1iBe
सकाळी 11 वाजतापर्यंत 28.12 टक्के मतदान : जम्मू काश्मीरमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून शांततेत सुरुवात झाली आहे. सकाळी 11 वाजतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये 28.12 टक्के मतदान पार पडलं आहे. यात बांदीपोरा 28.04 टक्के, बारामुल्ला 23.20 टक्के, जम्मू 27.15 टक्के, कठुआ 31.78 टक्के, कुपवाडा 27.34 टक्के, सांबा 31.50 टक्के आणि उधमपूर 33.84 टक्के मतदान झालेलं आहे.
#WATCH | Jammu: Democratic Progressive Azad Party Chairman Ghulam Nabi Azad shows his inked finger after casting his vote at a polling station in Jammu for the Jammu and Kashmir Assembly Elections. pic.twitter.com/cvrFuLWVlD
— ANI (@ANI) October 1, 2024
Final phase of J-K Assembly polls begins today: 40 constituencies to vote amid tight security
— ANI Digital (@ani_digital) October 1, 2024
Read @ANI Story | https://t.co/ipoA83S342#JammuKashmir #Assemblyelections #ElectionCommission pic.twitter.com/z62qbgx7Br
काश्मीरमध्ये 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा होत आहे मतदान : जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा सार्वजनिक निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांनी मोठी तयारी केली आहे. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली असून काश्मीरमधील 39.18 लाखांहून अधिक मतदार 1415 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद करणार आहेत. जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूक 2024 तगड्या बंदोबस्तात शांततेत सुरू आहे. उत्तर काश्मीर विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. बांदीपोरा जिल्ह्यातील संबल सोनावरी भागात सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. यावेळी मतदारांनी, "मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत म्हणूनच आम्ही पुन्हा मतदान करणार आहोत. आम्ही निवडलेले लोकप्रतिनिधी समस्यांवर तोडगा काढतील, अशी आशा आहे," असं प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
#WATCH | J&K: People enter a polling station in Jammu as voting begins for the 3rd & final phase of the Assembly elections today
— ANI (@ANI) October 1, 2024
Eligible voters in 40 constituencies across 7 districts of the UT are exercising their franchise today. pic.twitter.com/CnFsCyaKTe
जम्मू काश्मीरच्या 7 जिल्ह्यातील 40 मतदार संघात मतदान : जम्मू काश्मीरचं विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक निवडणूक पार पडत आहे. विधानसभा निवडणूक 2024 साठी प्रशासनानं पूर्ण तयारी केली आहे. आज जम्मू काश्मीरमधील 7 जिल्ह्यातील तब्बल 40 विधानसभा मतदार संघात मतदान पार पडणार आहे. या 40 मतदार संघात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.
जम्मू-कश्मीर विधानसभा चुनाव में आज तीसरे और आखिरी दौर का मतदान है। सभी मतदाताओं से मेरा अनुरोध है कि वे लोकतंत्र के उत्सव को सफल बनाने के लिए आगे आएं और अपना वोट जरूर डालें। मुझे विश्वास है कि पहली बार वोट देने जा रहे युवा साथियों के अलावा नारीशक्ति की मतदान में बढ़-चढ़कर…
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2024
हेही वाचा :
- जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 जागांसाठी 54.11 टक्के मतदान - JK ASSEMBLY ELECTIONS 2024
- जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक 2024 Phase 2; मतदानाला सुरुवात, परदेशी शिष्टमंडळ देणार भेट, भाजपा नेत्यांचा 'हा' दावा - JK ASSEMBLY ELECTIONS 2024
- जम्मू काश्मीर निवडणुका : एकीकडे वारशासाठी लढा, नव्या पिढीलाही आशा - Jammu Kashmir Elections