'गुरूनाथ या भूमिकेबद्दल मिळाल्या संमिश्र प्रतिक्रिया' - अभिजीत खांडकेकर - mazya navryachi bayko
🎬 Watch Now: Feature Video
झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' यातील गुरूनाथ सुभेदार या भूमिकेमुळे अभिजीत खांडकेकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. या मालिकेत बहुतांश व्यक्तिरेखा बदलल्या. मात्र, गॅरी ही भूमिका शेवटपर्यंत होती. या भूमिका साकारताना मला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्याचे मत अभिजीत व्यक्त करतो. प्रेक्षकांचे प्रेम तर लग्न झाले असूनही एक्स्ट्रा मॅरेटियल अफेयर करणारा धोकेबाज अशा प्रतिक्रिया त्याच्या वाट्याला आल्या. विशेष मुलाखतीच्या या दुसऱ्या भागात अभिजीत गॅरीविषयी आणि त्याला आवडलेल्या वेब सिरीजविषयी सांगत आहे.