thumbnail

By

Published : Jan 27, 2022, 5:03 PM IST

ETV Bharat / Videos

Hindu Muslim Wedding : पुण्यात हिंदू मुस्लिम विवाह सोहळा उत्साहात संपन्न

पुणे :- प्रेमाच्या आड येणारी धर्माची बंधन झुगारत पुण्यात हिंदू मुस्लिम विवाह (Hindu Muslim Wedding) सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. काल प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने (Republic Day 2022) भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वजाला वंदन करून पुण्यातील आरिफ काझी आणि स्वाती शेवाळे या जोडप्याने शिवविवाह पद्धतीनं पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात भारतीय संविधानाला साक्षी ठेवत या दोघांनी आयुष्याचा जोडीदार म्हणून एकमेकांचा स्वीकार केला.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या उपस्थितीत हा शिवविवाह सोहळा पार पडला.आज देशात काही ठिकाणी धर्मीय राजकारणाच्या नावाखाली समाजा समाजात तेढ निर्माण केलं जातं आहे.तर दुसऱ्या बाजूला अश्या पद्धतीने समाजात सामाजिक बांधिलकी देखील पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.