कारवाईला आलेल्या मीरा भाईंदर पालिका कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला; पाच जणांवर गुन्हा दाखल - मीरा भाईंदर पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला
🎬 Watch Now: Feature Video
मीरा भाईंदर (ठाणे) - भाईंदर पूर्वेच्या बी. पी. रोड परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेलेल्या पथकावर हल्ला ( hawkers attack) करण्यात आला. तब्बल १०० पेक्षा अधिक फेरीवाल्यांनी एकत्र घोळका करून पालिका कर्मचारी व पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी फेरीवाल्यांना महाराष्ट्र सुरक्षा बलच्या कर्मचाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. फेरीवाला पथकाचे अधिकारी प्रशांत पाटील यांच्यावर हल्ला करत धक्काबुक्की केली. यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. पालिका अधिकारी प्रशांत पाटील (Officer Prashant Patil) यांच्या तक्रारीवरून नवघर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास नवघर पोलीस (Navghar Police Station) करत आहेत.