गणेशचतुर्थी निमित्त विठ्ठल मंदिरात गणपती बाप्पा विराजमान - विठ्ठल मंदिरात गणपती बाप्पा विराजमान
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर - गणेश चतुर्थी निमित्त श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेस पारंपारीक पोशाख व अलंकार घालण्यात आले होते. सावळ्या विठुरायाचे आणि रखुमाईचे रूप हे अलंकार चढवल्यामुळे अधिकच खुलून दिसते आहे. विठ्ठल मंदिरातील सभामंडपामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिर समितीचे सदस्य संभाजी राजे शिंदे यांनी पूजा केली. कोरोना पार्श्वभूमीवर विठुरायाचे मंदिर गेल्या सहा महिन्यापासून भाविकांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहे. दरवर्षी विठ्ठल मंदिरात सभामंडप येथे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत असते त्याची विधिवत दहा दिवस पूजा केली जाते. सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गणेशोत्सव निमित्ताने नियमावली तयार करून केली आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळांना या बाबत माहिती देण्यात आली आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे.