तब्बल 26 कोटींची व्हेल माशाची उलटी प्रकरणी पाच जणांना अटक, वन विभागाची मोठी कारवाई - seizes whale vomit worth Rs 26 crore thane
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे वनविभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड येथून ५ जणांना ठाणे वन विभागाने अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल २६ कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी जप्त केली आहे. २६ किलो वजनाची व्हेल माशाची उलटी असून व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीसाठी काही जण मालाड आणि अंधेरी येथे येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावर कारवाई करत ठाणे वनविभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली असून मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड येथून ५ जणांना ठाणे वन विभागाने अटक करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडून एकूण २६ कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी अर्थात अंबरग्रीस जप्त केले आहे. एकूण २६ किलो वजनाची व्हेल माशाची उलटी असून त्याचा उपयोग महागड्या अत्तर बनविण्यात येत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी आहे. अजूनही शकडो किलो अंबरग्रीस बाजारात तस्करी करता आणल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली असून त्या दिशेने तपास सुरु असल्याचे वन अधिकारी संतोष कंक यांनी सांगितले.