मुंबईतील पूरग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शहरासह महाराष्ट्रात 17 जुलै रोजी झालेल्या पावसाने मोठे नुकसान केले होते. या नुकसानीचे मुंबईत आतापर्यंत बीएमसीने कोणतेही सर्वेक्षण केले नाही किंवा कोणतीही मदत पोहोचलेली नाही. पूरग्रस्तांना अजूनही एका कापडावर राहावे लागत आहे. कांदिवली आणि मालाडमध्ये पावसाचे पाणी शेकडो लोकांच्या घरात सुमारे 12 फूट भरले होते. त्यामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले. परंतु, बीएमसी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूने अद्याप कोणतेही सर्वेक्षण किंवा मदतीबद्दल चर्चा झाली नाही. याबाबत, कांदिवली पूर्व हनुमान नगर येथील प्रभाग क्रमांक 28 चे शिवसेना नगरसेवक एकनाथ (शंकर) हुंडारे यांनी महापालिका आयुक्त आणि एसआरए अधिकाऱ्यांसह कांदिवलीतील विभागामध्ये बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी पीडित कुटुंबांना मदत व स्थलांतराविषयी लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यावेळी स्थानिकांनी सांगितले की, महानगरपालिका आणि एसआरएमधील गोंधळामुळे नेमकी मदत कोण करणार याबाबत स्पष्टीकरण मिळत नसल्याने मदतीचे घोंगडे भिजत राहिले आहे.