Fire in Vasai : वसईच्या कामणमध्ये भीषण आग - वसई विरार महापालिका
🎬 Watch Now: Feature Video

वसई - वसईच्या कामन परिसरातील शिलोत्तर येथे एका परफ्युम आणि प्लास्टिक बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची (Fire in Vasai) घटना आज सकाळी ११ वाजता घडली. ही आग इतकी भीषण होती की आगीचे मोठं मोठे लोळ उठलेले पाहायला मिळाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या (Vasai Virar Fire Department) अग्निशमन पथकाच्या जवानांना दिल्यानंतर जवानांकडून फायर इंजिनच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, लागलेल्या आगीत कंपनी व साहित्य जळून खाक झाले आहे. ही आग कशामुळे लागली आहे हे मात्र समजू शकले नाही.