Zika Virus : 'झिका व्हायरस'चा प्रादुर्भाव कसा रोखाल ? सांगत आहेत डॉ. प्रदीप आवटे - Zika virus information etv bharat
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राज्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना व्हायरससोबत दोन हात करत असतानाच यंत्रणेसमोर दुसरेच संकट येऊन उभे राहिले आहे. जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर गावामध्ये झिका व्हायरसची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे, या परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. झिकाचा रुग्ण आढळून आल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग कोणकोणत्या उपाययोजना करत आहे, याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.