ठाण्यातील बंद वॉटर पार्कमध्ये घुसली मगर - Crocodile found water park in thane
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - पर्यटकांसाठी बंद असलेल्या ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील सुरज वॉटर पार्कमध्ये तब्बल सात फूटी मगर आढळून आली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानजीक असलेल्या या वॉटर पार्कमध्ये मगर आढळून आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी 'रॉ' या वन्यजीव संघटनेच्या स्वयंसेवकांना याबाबत माहिती दिली. संस्थेच्या लोकांनी सूरज वॉटर पार्क येथे धाव घेत मगरीला सुखरूपपणे ताब्यात घेतले. त्यानंतर ठाणे वनविभागाचे रेंज ऑफिसर व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सहाय्याने मगरीला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. याआधी काही वर्षांपूर्वी एका बिबट्याचा देखील दर्शन झाले होते.