क्रिस्तीआनो रोनाल्डोचे कोल्हापुरातील समर्थक धावले गरजूंच्या मदतीला - Kolhapur Latest
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर - जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरची नेहमीच विविध विषयांमुळे चर्चा असते. याच कोल्हापूरात जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तीआनो रोनाल्डोच्या समर्थकांचा एक मोठा ग्रुप आहे. तोच ग्रुप आता लॉकडाऊन काळात कोल्हापुरातील गरजू निराधारांच्या मदतीला उतरला आहे. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांनी एक टेम्पो भरून शेणी सुद्धा दान केल्या आहेत. क्रिस्तीआनो रोनाल्डो समर्थकांचा कोल्हापुरात नेहमीच सामाजिक कामात सहभाग असतो, हे पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.