नयनरम्य! चिखलदऱ्यातील भीमकुंड धबधब्याचा मनमोहक ड्रोन VIDEO - Bhimkund Chikhaldara
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे. अनेक पर्यटन केंद्रांवरील धबधबे ओसंडून वाहत आहेत. विदर्भाचं काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन क्षेत्रातील व सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीतून वाहणारे धबधबे आता ओसंडून वाहत आहेत. चिखलदऱ्यातील सर्वात प्रसिद्ध भीमकुंड धबधब्याचे सौंदर्य अक्षरशः पर्यटकांना मोहीत करून टाकत आहे. भीमकुंड या पॉईंटवर तबल छोटे मोठे चार ते पाच धबधबे आहे. या धबधब्याचं आक्रळ विक्रळ रूप पाहण्यासाठी पर्यटक हमखास या पॉईंटला भेट दिल्याशिवाय राहत नाही. सध्या सभोवतालच्या हिरवाईतून पांढऱ्या शुभ्र पाण्याने वाहणाऱ्या धबधब्यांची दृश्य ड्रोन कॅमेऱ्याने कैद केले आहेत. सध्या कोरोनाचे निर्बंध शिथिल आहेत. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने संपूर्ण विदर्भातील पर्यटक चिखलदऱ्यामध्ये दाखल होत असून या निसर्गरम्य वातावरणाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. दरम्यान पुन्हा एकदा चिखलदाऱ्यामध्ये जंगल सफारी सुरू झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.