अर्जुन पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन खेळाडूवर का आली शेती करण्याची वेळ? - Rio Olympics
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - 2020 मध्ये खेळातील सर्वोत्कृष्ट मानल्या जाणारा अर्जुन पुरस्कार प्राप्त महाराष्ट्राच्या भुमिपूत्रावर आज शेती करण्याची वेळ आली आहे. याबद्दल जाणुन घेऊया ईटीव्ही भारतच्या या विशेष रिपोर्टमध्ये....
दत्तू भोकनळ हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील तरुण खेळाडू आहे. त्याने 2014 मध्ये राष्ट्रीय नौकानयन (Rowing) स्पर्धेत देशाला दोन सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. 2015 मध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये एक रौप्य आणि 2016 मध्ये चीनमध्ये झालेल्या 16 व्या आशियाई नौकानयन स्पर्धेत रौप्य पदक मिळवून आपली कामगिरी उंचावत नेली होती. या कामगिरीच्या आधारावर त्याला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत संधी मिळाली होती. भारताकडून नौकानयनसाठी पात्र ठरलेला तो एकमेव खेळाडू होता. 2017 मध्ये त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. तर 2020 मध्ये दत्तू भोकनळ अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता.