VIDEO : अमरावतीच्या वलगावमध्ये श्री गाडगे महाराज वृध्दाश्रमात वृध्दांचे अभ्यंगस्नान - दिवाळी स्पेशल न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती : दिवाळी प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश टाकणारा सण. या सणाला गोड-धोड ,नवीन कपडे, नवीन वस्तूंसह आपण साजरा करतो. .परंतु आजही समाजात अनेक जण असे आहे की त्यांची दिवाळी अंधारात जाते. म्हणून वृद्धाश्रमात आणून टाकलेल्या वृद्ध लोकांची दिवाळी अंधारात जाऊ नये. त्यांची ही दिवाळी प्रकाशमय झाली पाहिजे या उद्देशाने अमरावतीच्या वलगाव मधील श्री संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात मागील सव्वीस वर्षापासून दिवाळी आनंदात साजरी केली जाते. यंदाही भाऊबीजेला अभयंगस्नान घालून या वृद्धांना नवीन कपडे देतात. या आश्रमाचे संचालक डॉक्टर कैलास बोरसे व त्यांचा संपूर्ण परिवार वर्षभर या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सेवेत असतो. यंदाही त्यांनी या वृद्धांची दिवाळी साजरी केली आहे. सन १९५२ मध्ये संत गाडगे महाराजांनी स्वत: स्थापन केलेल्या श्री गाडगे महाराज मिशनअंतर्गत हे वृध्दाश्रम चालविले जाते. आज या वृध्दाश्रमामध्ये ३० वृध्द आधाराला आहेत. डॉ.कैलास बोरसे आणि त्यांचा संपुर्ण परिवार गेल्या २६ वर्षांपासून या वृध्दांच्या सेवेत आहे. गाडगे महाराजांच्या दशसुत्रीनुसार आज या वृध्दाश्रमाची वाटचाल सुरू आहे.