50 वर्षीय व्यक्तीने वाचविले समुद्रात पडलेल्या महिलेचे प्राण, पाहा थरारक VIDEO - VIDEO NEWS
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया परिसरात सोमवारी एक थरारक घटना घडली आहे. समुद्रातील लाटा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा अचानक तोल गेल्याने ती समुद्रात पडली. या महिलेचा जीव वाचवण्यासाठी एका 50 वर्षीय व्यक्तीने समुद्रात उडी टाकली आणि तिला वाचविले आहे. दरम्यान, नागरिकांनी समुद्रात दोरी आणि ट्यूब फेकले. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला ट्यूब आणि दोरीच्या साहायाने किनाऱ्यापर्यंत आणले. महिलेचे प्राण वाचविणारा व्यक्ती गेट वे ऑफ इंडियावर फोटो काढण्याचे काम करत असून गुलीबचंद गोंड असे त्याचे नाव आहे.
Last Updated : Jul 12, 2021, 9:28 PM IST