औरंगाबादमध्ये फिरते गणेश विसर्जन हौद आपल्या दारी - गणेश चतुर्थी
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - आपल्या दारी करूया वंदन गणेशाचे निर्दालन कोरोनाचे हा उपक्रम पैठण येथील मानसी महिला नागरी पत संस्था तसेच नगरपरिषद पैठण यांच्या वतीने उपक्रम राबवण्यात आला. गोदावरीचे प्रदूषण थांबण्यासाठी अनंत चतुर्दशीला शहरात पर्यावरणपूरक हौदाची निर्मिती करण्यात आली होती. यात निर्माल्य संकलनही करण्यात आले आहे. यामुळे गोदावरीचे प्रदूषण टाळण्यास मदत होईल. परिणामी गणेश भक्तांना सहकुटुंब गणेश विसर्जनाचा आनंद घेता येईल. गर्दीपासून दूर राहत कोरोना संसर्गाचा धोका टाळता येणार असल्याचे या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी देवेश ईनामदार,चेअरमन संगिता ईनामदार,व्हॉईस चेअरमन अश्विनी मडके सह संचालक मंडळाने केले होते.