CM UDDHAV THACKERAY : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींना ऐकवला बालपणीचा एक मजेदार किस्सा - ठाणे ते दिवा रेल्वे न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या 5व्या आणि 6व्या मार्गीकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना ( CM UDDHAV THACKERAY PM MODI ) आपल्या आजोबांनी सांगितलेला एक मजेदार किस्सा ( Uddhav Thackeray told Modi a funny childhood story ) ऐकवला. ब्रिटीशांच्या काळात सुरू झालेल्या रेल्वे सेवेत भारतातील लोक चढण्यास घाबरत होते. वाफेच्या इंजिनच्या गाडीत बसल्यानंतर लोक गायब होतात, अशी भीती लोकांच्या मनात होती. तेव्हा लोकांना ट्रेनमध्ये बसण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस देण्यात आले होते. असा रेल्वेचा प्रवास सुरू झाला, असे ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST