VIDEO : जळगावातील घोडसगाव प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत फुटली; परिसरातील गावांना पुराचा धोका - जळगावातील घोडसगाव प्रकल्प
🎬 Watch Now: Feature Video

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावाजवळ असलेल्या घोडसगाव प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत फुटली आहे. सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुळा नदीला पूर आला असून, त्यात ही सांडव्याची भिंत वाहून गेली आहे. प्रकल्पातील पाणी वाहून जात आहे. त्यामुळे बहुळा नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे.
पाचोरा तालुक्यातील शेवटच्या टोकाला तसेच मराठवाड्याच्या सीमेजवळ बहुळा नदीवर घोडसगाव प्रकल्प आहे. सोयगाव तालुक्यातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाल्याने तेथील झिंगापूर धरण ओव्हर फ्लो झाले आहे. त्या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे घोडसगाव प्रकल्पही तुडुंब भरला आहे. यातच प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत फुटली आहे. पाण्याचा विसर्ग वाढला असून, बहुळा नदीला महापुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीकाठच्या पिंपळगाव हरेश्वर, भोजे, चिंचपुरे, सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक, वरखेडी खुर्द, वरखेड बुद्रुक, लासुरा तसेच लोहारी या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.