VIDEO : ..तो संसद सदस्यांवरील हल्लाच होता, शरद पवारांनी सांगितली राज्यसभेतील आँखो देखी - संसदेत गोंधळ
🎬 Watch Now: Feature Video
राज्यसभेत झालेल्या गोंधळाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. सभागृहात घुसलेल्या मार्शलनी महिलांना धक्काबुक्की केली. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना अक्षरश: उचलले होते. यापूर्वी मी असा प्रकार कधीच पाहिला नव्हता. राज्यसभेत त्या दिवशी घडलेला हा प्रकार म्हणजे संसद सदस्यांवरील हल्लाच होता, असे घणाघात शरद पवार यांनी केला आहे.