VIDEO: अजित पवारांच्या जनता दरबारात लांबच लांब रांगा! - baramati latest news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12628470-thumbnail-3x2-ajit-pawar-janta-darbar.jpg)
बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबारादरम्यान नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र शनिवारी बारामतीत बघायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवारांचा जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता. परंतु मागील काही दिवसांपासून तो पुन्हा भरविण्यात येत आहे. शनिवारीही आयोजित जनता दरबारादरम्यान नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसले. यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याचे चित्रही बघायला मिळाले. मतदारांना विविध कामांसाठी पुणे-मुंबईत भेटायला यावे लागू नये, म्हणून अजित पवार स्वतः बारामतीत नागरिकांना भेटत असतात. विशेष बाब म्हणजे जनता दरबारात आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे अजित पवार आस्थेवाईक ऐकून घेत त्यांची कामे मार्गी लावतात. या जनता दरबारावेळी विविध खात्यांचे शासकीय अधिकारीही उपस्थित असतात. नागरिकांचे ज्या विभागाकडे काम आहे, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नागरिकांचे निवेदन देऊन, तात्काळ मार्ग काढण्याचे आदेश अजित पवार देत असतात. आजच्या जनता दरबारात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली.