VIDEO : गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात व साश्रूपूर्ण नयनांनी अंत्यसंस्कार - गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
🎬 Watch Now: Feature Video
सांगोल्याचे माजी आमदार, माजी मंत्री, शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेंसह आमदार, खासदार अन् दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. ज्येष्ठ सुपूत्र पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांच्या मृतदेहाला भडाग्नी दिला. त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांना पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज देण्यात आला.