COVID-19: दादरमध्ये 'गो कोरोनाचा गो'च्या नाऱ्यासह घंटानाद... - corona news
🎬 Watch Now: Feature Video
कोरोना व्हायरसच्या विरोधात अनेक डॉक्टर, परिचारिका, सरकारी कर्मचारी, पोलीस, रेल्वे-बस कर्मचारी, घरपोच सेवा देणारे लोक स्वत:ची पर्वा न करता जनतेची सेवा करत आहेत. या सर्वांचे दादर येथील खांडगे इमारतीत नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाट आणि घंटानाद करुन आगळेवेगळे कौतुक केले. तर लहानग्यांनी गो कोरोनाचा नारा यावेळी दिला.